योगेश्वरी हॉस्पिटल
अँड आय सी यू
शालीमार चौक, दौंड
जि. पुणे फोन क्र. ७२७६५०२७७७, ०२११७-२६२२६५
फिटच्या आजाराबद्दल माहिती
फिटचा झटका अचानक येतो.त्यामुळे रुग्णास पडणे, लागणे, हाड मोडणे, पाण्यात बुडणे असे
अपघात होऊ शकतात.
फिटच्या
आजारामध्ये रुग्णाने घ्यायची काळजी:
·
आपल्या
आजाराबद्दल आपले सहकारी, नातेवाईक, शाळेतले शिक्षक आदींना कल्पना देवून ठेवा.
·
आपल्याबरोबर आपलं एखादं ओळखपत्र कायम
ठेवावे.उदा.पॅन किंवा आधार कार्ड, किंवा नाव असलेले ब्रेसलेट.
·
धोकादायक ठिकाणी जाणे, मशिनरी वापरणे, धारदार शस्त्रे,
उष्ण उपकरणे वापरणे टाळावे.
·
फिटचा आजार आटोक्यात नसेल तर गाडी चालवू नये.
यामुळे स्वतः व दुसऱ्या व्यक्तिला सुद्धा धोका होवू शकतो. ड्रायव्हिंग बाबतीत आधी
वैद्यकीय सल्ला घ्यावा.
·
पोहायला जाताना एकटे जाऊ नये. ज्याला आजाराबद्दल
माहिती आहे आणि पोहायला चांगले येते अशी व्यक्ती बरोबर हवी. सायकल चालवताना
हेल्मेट वापरावे.
·
सर्व गोळ्या नियमित घ्यावा. डॉक्टराच्या
सल्ल्याशिवाय गोळया बंद करू नये.
·
झोप पुरेशी व्हायला पाहिजे. रात्री किमान ६ ते ८
तास तरी झोप होणे आवश्यक आहे.
·
TV व मोबईलवर गेम्स खेळणे टाळावे.
·
दारू पूर्णपणे बंद करणे.
दारूमुळे फिटची शक्यता तर वाढतेच पण औषधांचा परिणाम सुद्धा कमी होतो.
·
तापामध्ये व आजारपणामध्ये फिटच्या झटक्याची शक्यता वाढते.
मानसिक ताणताणाव, जागरण, अपुरे अन्न हीसुद्धा अजून काही कारणे आहेत.
·
डॉक्टरांना आपल्या
आजाराची व औषधाची माहिती व्यवस्थित दयावी म्हणजे त्याप्रमाणे त्यांना औषधे ठरवता
येतात.
·
फिटच्या
आजारामध्ये MRI, CT स्कॅन, EEG आदी तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.
फिटच्या
झटक्यामध्ये घ्यायची काळजी:
एखाद्या व्यक्तीला फिटचा झटका आल्यास फिटचा जोर ओसरल्यावर रुग्णाला एका कुशीवर ठेवावे. फिट बहुतेक वेळा थोडया वेळात थांबते. घाबरून जाऊ नये.
·
फिटच्या
झटक्यामध्ये कधीकधी जीभ मागे पडते. पोटातील अन्न, जठरातील स्त्राव किंवा
नाकातोंडातील स्त्राव श्वासनलिकेत जाऊन श्वसनात अडथळा येवू शकतो.
·
या
चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे रुग्णास ठेवल्यास श्वासाचा त्रास होण्याची शक्यता कमी
होते.
·
ताकदीने
तोंड उघडण्याचा प्रयत्न करू नये. त्याने अधिक इजा होऊ शकते.
·
फिटचा
झटका गेल्यानंतर बऱ्याचदा रुग्णाची मनस्थिती गोंधळाची असते. काही वेळा रुग्ण
गुंगीमध्ये असतो. अश्यावेळी रुग्ण पूर्ण सावध होयीपर्यंत कोणीतरी त्याच्यासोबत
राहणे आवश्यक आहे.
·
हातात किल्ल्या देऊन, कांद्याचा किंवा
चप्पलचा वास देऊन फिट थांबत नाही.
·
फिटचा
झटका चालू असताना रुग्णास तोंडाने पाणी किंवा औषधे वगैरे काहीही देवू नये.
·
एकामगोमाग
एक फिटचे झटके येवू लागले तर ताबडतोब रुग्णास इस्पितळात न्यावे.
·
रुग्णास
हृदयविकार, मधुमेह किंवा इतर काही कारणांनी फिट येत असण्याची शक्यता असेल तर
ताबडतोब इस्पितळात न्यावे.
डॉ सिद्धार्थ कुलकर्णी डॉ क्षितिजा कुलकर्णी
Usefull information ,thank you for providing
ReplyDeletetop ent specialist in hyderabad