Thursday, 26 March 2015

Precautions for patients with asthma and chronic cough

दम्याचा आजार व वारंवार होणारा खोकल्याचा त्रास

दम्याचा आजार हा श्वास नलिकांची रुंदी कमी झाल्यामुळे होतो. जोपर्यंत अरुंद झालेल्या श्वास नलिका पुन्हा नॉर्मल रुंदीच्या होत नाही, तो पर्यंत हा त्रास चालूच असतो.

श्वासमार्ग जास्त वेळ अरुंद राहिल्यास त्यात कफ (थुंकी/बेडका) अडकतो. त्यानंतर श्वास मार्गात सूज निर्माण होते अशा प्रकारे होणारा त्रास हा अधिकाधिक वाढतच जातो.

दम्याचा त्रास शक्यतो पावसाळ्यात अथवा ढगाळ हवेत जास्त होतो. दमा पुर्णपणे जाईल अशी खात्री कुणीच देऊ शकत नाही. कायमचा दमा घालविण्यासाठी औषध नाही. परंतू त्रास होत असल्यास योग्य औषधोपचार घेतल्याने दम्याचा त्रास कमी करू शकतो.
काही पेशंटचा दररोज औषध घेतल्यास औषधांची सवय होईल असा गैरसमज आहे. जर दररोज दम्याचा त्रास होत असेल तर तो सहन केल्यास फुफ्फुसातील श्वास मार्ग व अन्य पेशींची हानी होते व त्याचेच रुपांतर पुढे फुफ्फुस व हृदय यांवर होवून आयुष्य अकाली विकलांग होते.

काही सुरक्षित औषधे नियमितपणे वापरल्यास फुफ्फुस व पर्यायाने शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते व दम्याचा रुग्ण सुद्धा शतायुषी व सुखी होवू शकतो.

याच उद्देशाने पुढील सूचना वाचाव्यास व त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करावा.   

दम्याचा पेशंटसाठी सुचना

•धूळ, माती, धूर, केमिकल्स (acid, अल्कली यांचा संपर्क अथवा वाफ श्वासावाटे जाणे ) या पासून दूर रहा.
•विडी, सिगारेट ई. धुम्रपान पूर्णपणे बंद करणे, धुम्रपान करणाऱ्यांच्या शेजारी उभे राहिले तरी अपाय होण्याची शक्यता असते.
•झाडणे, झटकणे स्वतः करू नये, दुसरे करीत असल्यास त्या ठिकाणी थांबू नये.
•रस्त्यावरची धुळ अथवा सार्वजनिक ठिकाणी उडणारी धुळ टाळता येत नसेल तर नाका तोंडावर स्वच्छ रुमाल धरुन त्यातून गाळून घेतलेली हवा श्वासावाटे घ्यावी.
•थंड हवा टाळावी , शितपेय, आईस्क्रीम बंद.

जेवणाचे पथ्य प्रत्येक पेशंटला वेगवेगळे असू शकते.
•जे पदार्थ खाल्याने त्रास होत नाही ते विनाकारण वर्ज्य करू नये. त्याच प्रमाणे ज्या पदार्थाच्या सेवनाने अपाय होतो, असे लक्षात आले ते पदार्थ खाऊन त्रास वाढवून घेऊ नये.
•स्कूटर-मोटार सायकलवरून प्रवास करू नये, त्यामुळे दम्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
•दुचाकी वाहन वापरणे अत्यावश्यक असल्यास नाक व तोंड झाकले जाईल अशा प्रकारचे पारदर्शक हेल्मेट वापरावे.
•बस किंवा कारमध्ये प्रवास करताना खिडकीजवळील आसनावर बसू नये, त्यामुळे वाऱ्याचा झोत सतत नाका तोंडात जावून दम्याचा व खोकल्याचा त्रास वाढतो.
•कारमध्ये स्वतः प्रवास करीत असल्यास अथवा चालवीत असल्यास गाडीची काच बंद ठेवावी.
•घरातील फरशी झाडण्यापेक्षा ओलसर कपड्याने पुसून काढावी.
•घरात उदबत्या, सेंट, उग्रवासाचे पदार्थ, अत्तर याचा वापर करू नये.
•घरात पाळीव प्राणी मांजर, कुत्रा,पोपट इत्यादी पाळू नये.
•झोपण्याच्या खोलीत कमीतकमी सामान ठेवावे.
•झोपण्याच्या खोलीत हवा खेळती ठेवावी.
•गादी व उशी यांना प्लास्टिकचे बेडशिट किंवा मऊ रेक्झिनचे उश कव्हर वापरावे.
•पाऊस व पावसात भिजणे टाळावे.
•शेतातील हवा आजूबाजूच्या पिकांवरील परागकण (pollens ) वाहून आणत असते. बऱ्याचश्या शेतकऱ्यांना त्याची अलर्जी असते. त्यामुळे ठराविक पिकांच्या सिझन मध्ये ठराविक कालावधीमध्ये दरवर्षी दम्याचा त्रास होत असल्यास आजुबाजूच्या वातावरणात असलेली पाने,फुले इ. चा अभ्यास करून ती पिके / झाडे टाळण्याचा प्रयत्न करा.
•आपल्या पांघरुणाला दररोज कडक उन दाखविण्याची सवय ठेवावी.
•उलनची (लोकरीची) blanket वापरण्यापेक्षा सुती चादर वापरण्याची सवय ठेवावी.
•मनस्ताप होईल असे विषय व वादविवाद टाळावेत.
रात्रीचे जेवण असे विषय व वादविवाद करण्यापूर्वी घेणे. व शक्यतो कमी जेवावे. दोन वेळा भरपूर जेवणापेक्षा तीन-चार वेळा थोडे थोडे खावे.
•वर्षातून एकदा छातीचा एक्सरे (फोटो) काढून घ्यावा.
•ओषधे वारंवार घेणे अावश्यक असल्यास औषधांच्या सुरक्षितते संबंधी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
•मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे.(शक्यतो उपाशीपोटी)
•पिण्यासाठी कोमट / गरम पाण्याचा वापर करावा.
•श्वासावाटे पाण्याची वाफ घेणे, त्यात औषधांचा वापर करून औषधीयुक्त वाफ घ्यावी.(त्यातील औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वापरावीत. हा उपचार सर्दी / पडसे / खोकला इ. कान, नाक, घशासंबधी असलेल्या त्रासाला जास्त उपयुक्त ठरतो.)
•टॉ‍‍‌न्सिल, घशाचे आजार, दात व हिरड्यांचे आजार असल्यास तोंडातील वातावरण जंतुयुक्त असते. त्यामुळे दमा कमी होत नाही, त्यासाठी त्या आजारांच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
•शक्यतो श्वासावाटे घ्यावयाची औषधे उदा. औषधयुक्त इन्हेलर(पंप) रोटोकॅप (रोटोहेलच्या मदतीने घ्यावयाच्या गोळ्या) वापरणे.
•ब्लड प्रेशर अथवा हृदयरोग्यांसाठी औषधोपचार चालू असल्यास डॉक्टरांना कल्पना दयावी. काही औषध दम्याचा त्रास वाढवू शकते.
लवकर झोपण्याची व लवकर उठण्याची सवय ठेवावी. जागरणाने दम्याचा त्रास अधिक बळावतो.
•पाणी(H2O)बदलल्यामुळे खोकला येत नाही. पाणी सर्वत्र सारखेच असते. प्रवास करताना खिडकीत बसल्यामुळे (वारा, धूळ, थंड हवा श्वसन मार्गाला लागल्यामुळे) आलेला खोकला 'पाणी बदलल्यामुळे झाला' असा गैरसमज आहे. बर्फाचे पाणी मात्र दमा / खोकला वाढविते.
•प्राणायाम व योगासने नियमित केल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
•भात खाल्ल्याने दमा / खोकला होत नाही.
•तंबाखू, मद्यपान व मांसाहार टाळावा.
•वरील सुचना वाचुन झाल्यानंतर अधिक स्पष्टीकरण पाहिजे असल्यास तसे डॉक्टरांना अवश्य विचारावे.
---------------------------------------------------------------------------------       
    प्रत्येक पेशंटला तपासत असताना या सर्व गोष्टी सांगणे शक्य नसल्यामुळे व पेशंटलाही तोंडी सांगितलेले लक्षात ठेवणे अवघड असल्यामुळे या छापील सुचना तयार केलेल्या आहेत. आपण याचे वाचन / मनन व आचरण केल्यास आपल्या प्रकृतीला याचा फायदा अवश्य
Courtesy :
Dr Aniket Gangurde
Consultant chest physician
Nashik

Thursday, 12 March 2015

Diet chart for hyperuricemia in Marathi

युरीक अ‍ॅसीड जास्त असल्यास पाळावयाची पथ्ये

  1. मांसाहार करु नये. चिकन, मटन, फिश, अंडी यापैकी सर्व गोष्टी पुर्ण वर्ज कराव्यात.
  2. डाळी व डाळीचे पदार्थ टाळावे.उदा. वरण, आमटी,उसळी,पिठले,शेव,फरसाण,पुरणपोळी.
  3. सर्व प्रकारची फळे व हिरव्या पालेभाज्या चालतात.खुप गोड फळे खाऊ नये.
  4. फळांच्या डबाबंद रसाने युरीक अ‍ॅसीड वाढु शकते.
  5. धान्ये कडधान्ये, सुका मेवा, याबाबत कोणतेही बंधन नाही.
  6. दुध व सर्व दुग्धजन्य  पदार्थ चालतात.
  7. दारु पुर्णपणे बंद करणे, बीअरमुळे इतर प्रकारच्या दारुपेक्षा जास्त प्रमाणात युरीक अ‍ॅसीड वाढते.  
  8. पाणी भरपुर पिणे, रोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्यावे.
  9. तेलकट व चरबीयुक्त खाणे कमी करावे. 

डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 



फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५

Diet chart for acidity in Marathi


आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) चा त्रास असलेल्या पेशंटसाठी सुचना:

1) जास्त वेळ उपाशी राहु नये. दर 3-4 तासांनी थोडे थोडे अन्न खावे.
 2) घशात बोटे घालून ओकारी काढु नये.त्यामुळे अन्ननलिकेला इजा होवु शकते.
 3) चहा/काफी घ्यावयाची असल्यास बरोबर काहीतरी खावे उदा.बिस्किट टोस्ट ब्रेड नाश्ता वगैरे
 4)सकाळी उठल्याबरोबर चहा काफी घेउ नये, चहा नाश्त्यानंतर घ्यावा.
  5) तिखट पदार्थ व मिरची टाळावी.चाटचे प्रकार खाऊ नयेत.
  6)  मसालेदार पदार्थ व मीठ जास्त असलेले पदार्थ खाऊ नये.
 7) द्राक्ष,संत्रि,मोसंबी, अशी फळे टाळावीत. आंबट फळे टाळावीत .
 8) आंबट पदार्थ खाउ नयेत. उदा. आंबट दही , ताक, टोमॅटो, लिंबाचा वापर कमी करावा.
 9) रात्रीच्या जेवणामधे व झोपण्यामधे कमीत कमी दोन तासांचे अंतर असावे. जेवणानंतर लगेच आडवे होऊ नये.जमल्यास थोडा वेळ चालावे.रात्रीाचे जेवण कमी करावे. नेहमीच जेवताना सावकाश जेवावे. एका वेळी जास्त खाउ नये; त्याने सुध्दा अ‍ॅसिडीटीचा त्रास होऊ  शकतो.
 10) पाणी भरपूर प्यावे.
 11) झोप पुरेशी व्हायला हवी.जाग्रणामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढतो.
 12) तंबाखु,गुटखा व सिगारेट पूर्णपणे बंद करणे.दारु पूर्णपणे बंद करणे.याकरीता गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घेणे.
 13) वेदनाशामक गोळ्या व सांधेदुखीच्या गोळ्या डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेवु नये.
 14) मानसिक ताणतणाव टळावा.
 15) आजाराचे अचूक निदान करण्यासाठी सोनोग्राफी व जठराची दुर्बीण घालून केलेली तपासणी करणे आवश्यक असते. काही वेळा पोटाचा कॅन्सर किंवा अल्सर असण्याची शक्यता असते.


डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 



फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५


Diet chart for anemia in Marathi

ॲनिमिया (रक्ताची कमतरता):

लक्षणे :

           1) अशक्तपणा, थकवा, अंगदुखी
          2) कामात अभ्यासात लक्ष न लागणे
          3) दम लागणे, छातीत दुखणे
          4) सुज येणेे
          5) चक्कर येणे
          6) भुक न लागणे वारंवार तोंड येणे
          7) डोके दुखणे

कारणे :

    1)  अतिरीक्त रक्तस्ञाव होणे उदा. पाळीमध्ये, मुळव्याधीचा ञास,जठरात अल्सर(जखमा ) होणे        
    2) गरोदरपणा व प्रसुतीे
    3)  तंबाखु,गुटखा आदी सेवन
    4) मांसाहाराचे  कमी प्रमाण, अन्नाचे कमी प्रमाण ,जास्त उपवास करणे
    5) थायरॉइडचे,रक्ताचे, किडनीचे व इतर काही आजार
    6) आतडयाचे आजार व जंत

तपासण्या :
हिमोग्राम , रक्तातील लोहाचे प्रामाण व जीवन्सत्वाचे प्रामाण तपासणे आणी गरजे प्रमाणे इतर तपासण्या उदा. शौचाची तपासणी, हाडातील रक्ताची,, तपासणी, जठराची व आतडयाची दुर्बीणीद्वारे तपासणी, सोनोग्राफी.


आहार :
              1) हिरव्या पालेभाज्या
              2) मटन व मासे
              3) अंडी
              4) शेंगदाणे
              5) डाळिंब ,सफरचंद पेरू,संञी,मेासंबी आदी फळे
6) खजूर व  मनुका
             7) अन्नावर लिंबु पिळल्यामुळे अन्नातील लोह पचनास मदत होते.
             8) मेाड आलेली कडधान्ये उदा.मटकी
             9) अन्न आंबवणे व अन्न लोखंडी भांडयामध्ये शिजवण्याने अन्नातील लोहाचे प्रामाण वाढते.
            10) शिळे अन्न असल्यास त्यात जीवनसत्वाचे प्रामाण कमी होते.
पथ्ये:
   चहा,कॉफी ,तंबाख,सुपारी चुना हे पदार्थ टाळावे . दुधाचे अतीरिक्त सेवन करू नये. बीटाचे अधीक सेवन करण्याचा रकतवाढीस फायदा होत नाही.

डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 



फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५

Wednesday, 11 March 2015

Information about hypothyroidism in Marathi


हाइपोथायरायडिजम आजाराबद्दल माहिती:

थायराईड ही एक लहान ग्रंथी असूुन तिचा आकार फ़ुलपाखरासारखा असतो. ती गळ्याच्या खालच्या भागात मध्यभागी असते. शरीराचा चयापचयाचा वेग ( कज्ळ्ग्घ्ब्न्त्ल्प्)  नियंत्रीत ठेवणे व त्यासाठी थायराईड संप्रेरकांची निर्मीती करणे, हे या ग्रंथीचे मुख्य काम आहे. हायपोथायराईडीसम या आजारात या संप्रेरकांची निर्मीती कमी होते. येथे आपण हायपोथायराईडीसम या आजाराची माहिती घेणार आहोत.

हायपोथायराईडीजम  : म्हणजे शरीरात थायराईड संप्रेरकांची निम्रिती कमी होणे. त्यामुळे चयापचयाचा वेग कमी होतो. बहुतेक वेळा रुग्णाला हा आजार आयुष्यभर रहातो व त्याकरता कायमच उपचार घ्यावे लागतात.

हायपोथायराईडीसमची लक्षणे:
थकवा व अशक्तपणा येणे
हातापायांना व चेहîयाला सुज येणे.
थायराईड ग्रंथीला सुज येणे. ( गॉयटर )
वजन वाढणे.
संधीवात होणे. हातापायांना मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे.
वंध्यत्व असणे.
विसराळूपणा वाढण, मानसिक ताणतणाव वाढणे.
केस जास्त गळणे. केस रुक्ष व रखरखीत होणे.
पाळीच्या तक्रारी ( अनियमितपणा, अधिक स्त्राव )
काही जणांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो. स्त्रियांमधे हायपोथायराईडीसम हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.

कारणे:
प्रतिकारशक्तीचा आजार : आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याच थायराईड ग्रंथीच्या विरुध्द कार्य करुन थायराईड ग्रंथीला नष्ट करते. हे या रोगाचे सर्वात जास्त आढळून येणारे कारण आहे.
थायराईडची शस्त्रक्रिया: काही आजारांमधे थायराईडची शस्त्रक्रिया करुन ती ग्रंथी पूर्णपणे काढण्यात येते.
किरणोत्साराचा उपचार, विषाणूंचा परिणाम, जन्मतःच ही ग्रंथी नसणे अशी सुद्धा काही कारणे आहेत. आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा अधिक प्रमाणामुळेसुद्धा हा आजार होतो. पण हे दुर्मिळ कारण आहे.
हायपोथायराईडीसमचे निदान: हायपोथायराईडीसमचे निदान करण्यासाठी फ4 व फदॠ या तपासण्या करणे आवश्यक आहे. केवळ बाह्यलक्षणांवरुन निदान केले जाऊ शकत नाही. कारण अनेक आजारात यासारखी लक्षणे आढळतात.

उपचार:
हा आजार पूण्र्पणे बरा होत नाही मात्र उपचारांनी थायराईड संप्रेरकांचे प्रमाण योग्य राहू शकते. आपल्या शरीरात जी थायराईड संप्रेरके तयार होतात हुबेहुब तशीच संप्रेरके गोळीच्या स्वरुपातही मिळतात. त्यामुळे योग्य प्रमाणात घेतल्यास या गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. गरोदर स्त्रियांमध्येसुद्धा गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम दिसत नाहीत.

गोळी कशी घ्यावी?

गोळी रोज सकाळी उपाशीपोटी एक पेला पाण्याबरोबर घ्यावी. गोळी घेतल्यावर अर्धा तास दुसरे कोणतेही औषध, अन्न, चहा, दूध वगैरे घेऊ नये. गोळी पाण्याशिवाय घेऊ नये. गोळी कधीही चुकवु नये. चुकून एखाद्या दिवशी गोळी घ्यायची राहीली तर दुसîया दिवशी दोन गोळ्या घ्याव्यात.पण दोनपेक्षा जास्त दिवस गोळ्या चुकल्या तरी दोनापेक्षा जास्त गोळ्या अशावेळी घेऊ नयेत.
गोळयांची कंपनी / ब्रॅण्ड बदलू डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय नये. सुट्ट्या गोळ्या घेऊ नयेत. गोळ्या नेहमी सीलबंद बाटलीत किंवा स्ट्रीपमध्ये ( पाकीटात) घ्याव्या. डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करु नयेत. हायपोथायराईडीसममधे नियमीतपणे  गोळ्या घेत रहाणे आवश्यक असते.

रक्ताची पुनर्तपासणी: 
फ्री T4 आणि TSH च्या पातळीसाठी रक्ताची पुनर्तपासणी दर सहा ते दहा आठवड्यांनी करणे आवश्यक आहे. गरोदरपणामधे वारंवार तपासणी करावी लागते.  काही आजारांमधे, मानसिक किंवा शारीरीक ताणाच्या काळात किंवा शस्त्रक्रिया वगैरे करायचीे असल्यास रक्ताची पुनर्तपासणी अधिक वेळा करावी लागते.

डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 



फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५ 

Tuesday, 10 March 2015

Chart for hypertension in Marathi

BP(रक्तदाबाचा) आजार असलेल्या व्यक्तींसाठी सुचना:

आहार :

खालील पदार्थ टाळायला हवेत.

1) मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत. उदा. पापड, लोणची, वेफर्स , फरसाण, शेव, खारे शेंगदाणे.
2) सोडा घातलेले व बेकरीचे पदार्थ टाळावेत. उदा. पाव, खारी, ब्रेड, बिस्कीटे.
3) साखर व साखर घालुन केलेले पदार्थ, गुळ, मध, फार खाऊ नयेत.
4)  तळलेले पदार्थ टाळावेत. तेल, तूप, लोणी, साय, चीज असे पदार्थ टाळावेत. करडई व सुर्यफुलाचे तेल जास्त चांगले. पाम तेल वापरु नये. शेंगदाणा तेल कमी वापरावे.
5) बोकड किंवा बकरीचे मटण खाऊ नये. पंधरा दिवसांतुन चिकन किंवा माश्याचे दोन-तीन तुकडे खाण्यास हरकत नाही. तळलेले मासे खाऊ नयेत.
6) दूध उकळुन व साय काढुन घ्यावे. दिवसातुन एक कप दूध किंवा एखाद दोन कप चहा घेण्यास हरकत नाही.
7) धुम्रपान, तंबाखु व दारु पुर्ण बंद करणे.
ताजी फळे , फळभाज्या आणी हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खाव्या.  जाड व्यक्तींनी वजन कमी करावे.

व्यायामाबद्दल:

रोज नियमीत व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. भराभर अर्धा ते पाऊण तास चालण्याचा व्यायाम सगळ्यात चांगला. व्यायाम सुरु करण्याआधी रक्तदाब योग्य असावा. त्यामुळे व्यायाम सुरु करण्याआधी वैद्यकिय तपासणी करणे आवश्यक आहे.

औषधांबद्दल:

औषधे नियमीतपणे घ्यावी. जुन्या औषधांच्या चिठ्ठ्या दाखवुन औषधे आणु नयेत. 
औषधे, व्यायाम आणि पथ्ये तिन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत.

डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 

फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५ 

  

Diet chart for diabetes mellitus in Marathi

मधुमेही व्यक्तींसाठी सुचना:

मधुमेहातील आहार :

हा आहार शक्य तितका नेहमीच्या आहारासारखाच असतो. जेणेकरुन पोषण नीट होयील. मधुमेही रुग्णाने एकावेळी जास्त खाऊ नये. हे सर्वात महत्वाचे पथ्य आहे. दिवसातुन तीन ते चार वेळा विभागुन थोडे थोडे खावे. महाराष्ट्रीय पद्धतीचे  साधे जेवण सगळ्यात चांगले. तसेच उपास करु नयेत. उपासामुळे रक्तातील साखर कमी होणे, त्यामुळे  अंधारी येणे, घाम फुटणे, छातीत धडधडणे, गुंगी येणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मधुमेही रुग्णाने उपास करु नयेत. जर वरिलपैकी त्रास झाला तर थोडी  साखर , दुध,मध किंवा बिस्कीट किंवा गोड पदार्थ खावे आणि ताबडतोब दवाखान्यात यावे. साखर किंवा ग्लुकोज पावडर फिरायला जाताना नेहमी जवळ ठेवावी.     
मधुमेही रुग्णाने खालील पदार्थ टाळायला हवेत.

1) बटाटा, रताळे, साबुदाणा, फळांचा रस
2) गोड पदार्थ, मिठाई, चाकलेट, वेफर्स
3) तळलेले पदार्थ
4) साखर व साखर घालुन केलेले पदार्थ, गुळ, मध,
5) केळी, आंबे, द्राक्षे, सीताफळे, अशी फार गोड फळे खाऊ नयेत. चिकु किंवा छोट्या पेरुच्या आकाराची दोन फळे रोज चालतील.
6) तेल, तूप, लोणी, साय, चीज असे पदार्थ टाळावेत. करडई व सुर्यफुलाचे तेल जास्त चांगले. पाम तेल वापरु नये. शेगदाणा तेल कमी वापरावे.
7) बोकड किंवा बकरीचे मटण खाऊ नये. पंधरा दिवसांतुन चिकन किंवा माश्याचे दोन-तीन तुकडे खाण्यास हरकत नाही. तळलेले मासे खाऊ नयेत.
8) बेकरीचे पदार्थ टाळावेत.
9) दूध उकळुन व साय काढुन घ्यावे. दिवसातुन एक कप दूध किंवा एखाद दोन कप चहा घेण्यास हरकत नाही. चहामधे साखर घेऊ नये किंवा कमी घ्यावी.


व्यायामाबद्दल:

रोज नियमीत व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. भराभर अर्धा ते पाऊण तास चालण्याचा व्यायाम सगळ्यात चांगला. व्यायाम सुरु करण्याआधी रक्तदाब योग्य असावा. त्यामुळे व्यायाम सुरु करण्याआधी वैद्यकिय तपासणी करणे आवश्यक आहे.

औषधांबद्दल:

औषधे नियमीतपणे घ्यावी. जेवणाच्या आधीची व नंतरची औषधे सांगितल्याप्रमाणे घ्यावी. जुन्या औषधांच्या चिठ्या दाखवुन औषधे आणु नयेत.  औषधे, व्यायाम आणि पथ्ये तिन्ही गोड्ढी सारख्याच महत्वाच्या आहेत.
पायांची काळजी:
मधुमेहामधे जखमा लवकर ठीक होत नाहीत. त्यामुळे पायांची जास्त काळजी घ्यावी. रोज झोपण्याआधी पायांची तपासणी स्वतः करावी. तळपायांची तपासणी आरश्याच्या मदतीने करावी.चपला किंवा बुट मऊ व योग्य मापाचे असावे. घट्ट किंवा सैल नकोत.

दवाखान्यात येताना:

1)            सांगितलेल्या तारखेस तपासणीस यावे.
2)            उपाशीपोटी रक्त तपासण्यासाठी पूर्ण उपाशी यावे.चहा/दुध/नाश्ता वगैरे घेऊ नये. पाणी घेतले तर चालेल.
3)            सर्व जुने रिपोर्ट आणी औषधांच्या चिठ्या घेवुन यावे.
4)            उपाशी पोटी रक्त दिल्यानंतर नेहमी प्रमाणे गोळ्या/इंजेक्शन घेवुनच नाश्ता करावा.
5)            गोळ्या संपल्या असतील तर दुकानातुन एक वेळापुरत्या गोळ्या घेणे.
6)            नाश्ता झाल्यावर दोन तासांनी पुन्हा रक्त तपासणी साठी द्यावे.

नियमितपणे करण्याच्या तपासण्या :
१)  रक्तातील साखरेची तपासणी
२) HbA1c ची तपासणी
३) रक्तदाबाची तपासणी
४) डोळ्यांच्या पडद्यांची तपासणी
५) पायांची तपासणी
६) रक्तातील कोलेस्टेरोल इ . तपासणी
७) वजनाची तपासणी
८) लघवीची तपासणी ( for protein and micro albumin)
९) E.C.G.



डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 
फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५ 


Monday, 9 March 2015

About us

Dr Siddharth Kulkarni
DNB Medicine

Dr Kshitija Kulkarni
FCPS DNB Medicine
IDCC ( Critical care)

Yogeshwari Hospital and ICU
Shalimar chowk,
Daund. Dist Pune

Pin 413801

phone 7276502777
02117-262265

email : yogehwarihosp@gmail.com

Sunday, 8 March 2015

About blog

Hi, Starting blog on 9 March 2015.
Purpose of writing this blog is to keep patients educated by providing charts and multimedia.
We are already doing it in print form since last many years.
Now with easy availability of internet and mobiles we are planning to start this blog and keep it updated.

Regards

Dr Siddharth Kulkarni

Dr Kshitija Kulkarni

डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 


फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५

Our Map