Thursday, 12 March 2015

Diet chart for acidity in Marathi


आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) चा त्रास असलेल्या पेशंटसाठी सुचना:

1) जास्त वेळ उपाशी राहु नये. दर 3-4 तासांनी थोडे थोडे अन्न खावे.
 2) घशात बोटे घालून ओकारी काढु नये.त्यामुळे अन्ननलिकेला इजा होवु शकते.
 3) चहा/काफी घ्यावयाची असल्यास बरोबर काहीतरी खावे उदा.बिस्किट टोस्ट ब्रेड नाश्ता वगैरे
 4)सकाळी उठल्याबरोबर चहा काफी घेउ नये, चहा नाश्त्यानंतर घ्यावा.
  5) तिखट पदार्थ व मिरची टाळावी.चाटचे प्रकार खाऊ नयेत.
  6)  मसालेदार पदार्थ व मीठ जास्त असलेले पदार्थ खाऊ नये.
 7) द्राक्ष,संत्रि,मोसंबी, अशी फळे टाळावीत. आंबट फळे टाळावीत .
 8) आंबट पदार्थ खाउ नयेत. उदा. आंबट दही , ताक, टोमॅटो, लिंबाचा वापर कमी करावा.
 9) रात्रीच्या जेवणामधे व झोपण्यामधे कमीत कमी दोन तासांचे अंतर असावे. जेवणानंतर लगेच आडवे होऊ नये.जमल्यास थोडा वेळ चालावे.रात्रीाचे जेवण कमी करावे. नेहमीच जेवताना सावकाश जेवावे. एका वेळी जास्त खाउ नये; त्याने सुध्दा अ‍ॅसिडीटीचा त्रास होऊ  शकतो.
 10) पाणी भरपूर प्यावे.
 11) झोप पुरेशी व्हायला हवी.जाग्रणामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढतो.
 12) तंबाखु,गुटखा व सिगारेट पूर्णपणे बंद करणे.दारु पूर्णपणे बंद करणे.याकरीता गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घेणे.
 13) वेदनाशामक गोळ्या व सांधेदुखीच्या गोळ्या डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेवु नये.
 14) मानसिक ताणतणाव टळावा.
 15) आजाराचे अचूक निदान करण्यासाठी सोनोग्राफी व जठराची दुर्बीण घालून केलेली तपासणी करणे आवश्यक असते. काही वेळा पोटाचा कॅन्सर किंवा अल्सर असण्याची शक्यता असते.


डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 



फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५


3 comments:

  1. सर,
    अतिशय माहितीपूर्ण ब्लॉग आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete