दम्याचा आजार व वारंवार होणारा खोकल्याचा त्रास
दम्याचा आजार हा श्वास नलिकांची रुंदी कमी झाल्यामुळे होतो. जोपर्यंत अरुंद झालेल्या श्वास नलिका पुन्हा नॉर्मल रुंदीच्या होत नाही, तो पर्यंत हा त्रास चालूच असतो.
श्वासमार्ग जास्त वेळ अरुंद राहिल्यास त्यात कफ (थुंकी/बेडका) अडकतो. त्यानंतर श्वास मार्गात सूज निर्माण होते अशा प्रकारे होणारा त्रास हा अधिकाधिक वाढतच जातो.
दम्याचा त्रास शक्यतो पावसाळ्यात अथवा ढगाळ हवेत जास्त होतो. दमा पुर्णपणे जाईल अशी खात्री कुणीच देऊ शकत नाही. कायमचा दमा घालविण्यासाठी औषध नाही. परंतू त्रास होत असल्यास योग्य औषधोपचार घेतल्याने दम्याचा त्रास कमी करू शकतो.
काही पेशंटचा दररोज औषध घेतल्यास औषधांची सवय होईल असा गैरसमज आहे. जर दररोज दम्याचा त्रास होत असेल तर तो सहन केल्यास फुफ्फुसातील श्वास मार्ग व अन्य पेशींची हानी होते व त्याचेच रुपांतर पुढे फुफ्फुस व हृदय यांवर होवून आयुष्य अकाली विकलांग होते.
काही सुरक्षित औषधे नियमितपणे वापरल्यास फुफ्फुस व पर्यायाने शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते व दम्याचा रुग्ण सुद्धा शतायुषी व सुखी होवू शकतो.
याच उद्देशाने पुढील सूचना वाचाव्यास व त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करावा.
दम्याचा पेशंटसाठी सुचना
•धूळ, माती, धूर, केमिकल्स (acid, अल्कली यांचा संपर्क अथवा वाफ श्वासावाटे जाणे ) या पासून दूर रहा.
•विडी, सिगारेट ई. धुम्रपान पूर्णपणे बंद करणे, धुम्रपान करणाऱ्यांच्या शेजारी उभे राहिले तरी अपाय होण्याची शक्यता असते.
•झाडणे, झटकणे स्वतः करू नये, दुसरे करीत असल्यास त्या ठिकाणी थांबू नये.
•रस्त्यावरची धुळ अथवा सार्वजनिक ठिकाणी उडणारी धुळ टाळता येत नसेल तर नाका तोंडावर स्वच्छ रुमाल धरुन त्यातून गाळून घेतलेली हवा श्वासावाटे घ्यावी.
•थंड हवा टाळावी , शितपेय, आईस्क्रीम बंद.
जेवणाचे पथ्य प्रत्येक पेशंटला वेगवेगळे असू शकते.
•जे पदार्थ खाल्याने त्रास होत नाही ते विनाकारण वर्ज्य करू नये. त्याच प्रमाणे ज्या पदार्थाच्या सेवनाने अपाय होतो, असे लक्षात आले ते पदार्थ खाऊन त्रास वाढवून घेऊ नये.
•स्कूटर-मोटार सायकलवरून प्रवास करू नये, त्यामुळे दम्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
•दुचाकी वाहन वापरणे अत्यावश्यक असल्यास नाक व तोंड झाकले जाईल अशा प्रकारचे पारदर्शक हेल्मेट वापरावे.
•बस किंवा कारमध्ये प्रवास करताना खिडकीजवळील आसनावर बसू नये, त्यामुळे वाऱ्याचा झोत सतत नाका तोंडात जावून दम्याचा व खोकल्याचा त्रास वाढतो.
•कारमध्ये स्वतः प्रवास करीत असल्यास अथवा चालवीत असल्यास गाडीची काच बंद ठेवावी.
•घरातील फरशी झाडण्यापेक्षा ओलसर कपड्याने पुसून काढावी.
•घरात उदबत्या, सेंट, उग्रवासाचे पदार्थ, अत्तर याचा वापर करू नये.
•घरात पाळीव प्राणी मांजर, कुत्रा,पोपट इत्यादी पाळू नये.
•झोपण्याच्या खोलीत कमीतकमी सामान ठेवावे.
•झोपण्याच्या खोलीत हवा खेळती ठेवावी.
•गादी व उशी यांना प्लास्टिकचे बेडशिट किंवा मऊ रेक्झिनचे उश कव्हर वापरावे.
•पाऊस व पावसात भिजणे टाळावे.
•शेतातील हवा आजूबाजूच्या पिकांवरील परागकण (pollens ) वाहून आणत असते. बऱ्याचश्या शेतकऱ्यांना त्याची अलर्जी असते. त्यामुळे ठराविक पिकांच्या सिझन मध्ये ठराविक कालावधीमध्ये दरवर्षी दम्याचा त्रास होत असल्यास आजुबाजूच्या वातावरणात असलेली पाने,फुले इ. चा अभ्यास करून ती पिके / झाडे टाळण्याचा प्रयत्न करा.
•आपल्या पांघरुणाला दररोज कडक उन दाखविण्याची सवय ठेवावी.
•उलनची (लोकरीची) blanket वापरण्यापेक्षा सुती चादर वापरण्याची सवय ठेवावी.
•मनस्ताप होईल असे विषय व वादविवाद टाळावेत.
रात्रीचे जेवण असे विषय व वादविवाद करण्यापूर्वी घेणे. व शक्यतो कमी जेवावे. दोन वेळा भरपूर जेवणापेक्षा तीन-चार वेळा थोडे थोडे खावे.
•वर्षातून एकदा छातीचा एक्सरे (फोटो) काढून घ्यावा.
•ओषधे वारंवार घेणे अावश्यक असल्यास औषधांच्या सुरक्षितते संबंधी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
•मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे.(शक्यतो उपाशीपोटी)
•पिण्यासाठी कोमट / गरम पाण्याचा वापर करावा.
•श्वासावाटे पाण्याची वाफ घेणे, त्यात औषधांचा वापर करून औषधीयुक्त वाफ घ्यावी.(त्यातील औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वापरावीत. हा उपचार सर्दी / पडसे / खोकला इ. कान, नाक, घशासंबधी असलेल्या त्रासाला जास्त उपयुक्त ठरतो.)
•टॉन्सिल, घशाचे आजार, दात व हिरड्यांचे आजार असल्यास तोंडातील वातावरण जंतुयुक्त असते. त्यामुळे दमा कमी होत नाही, त्यासाठी त्या आजारांच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
•शक्यतो श्वासावाटे घ्यावयाची औषधे उदा. औषधयुक्त इन्हेलर(पंप) रोटोकॅप (रोटोहेलच्या मदतीने घ्यावयाच्या गोळ्या) वापरणे.
•ब्लड प्रेशर अथवा हृदयरोग्यांसाठी औषधोपचार चालू असल्यास डॉक्टरांना कल्पना दयावी. काही औषध दम्याचा त्रास वाढवू शकते.
लवकर झोपण्याची व लवकर उठण्याची सवय ठेवावी. जागरणाने दम्याचा त्रास अधिक बळावतो.
•पाणी(H2O)बदलल्यामुळे खोकला येत नाही. पाणी सर्वत्र सारखेच असते. प्रवास करताना खिडकीत बसल्यामुळे (वारा, धूळ, थंड हवा श्वसन मार्गाला लागल्यामुळे) आलेला खोकला 'पाणी बदलल्यामुळे झाला' असा गैरसमज आहे. बर्फाचे पाणी मात्र दमा / खोकला वाढविते.
•प्राणायाम व योगासने नियमित केल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
•भात खाल्ल्याने दमा / खोकला होत नाही.
•तंबाखू, मद्यपान व मांसाहार टाळावा.
•वरील सुचना वाचुन झाल्यानंतर अधिक स्पष्टीकरण पाहिजे असल्यास तसे डॉक्टरांना अवश्य विचारावे.
---------------------------------------------------------------------------------
प्रत्येक पेशंटला तपासत असताना या सर्व गोष्टी सांगणे शक्य नसल्यामुळे व पेशंटलाही तोंडी सांगितलेले लक्षात ठेवणे अवघड असल्यामुळे या छापील सुचना तयार केलेल्या आहेत. आपण याचे वाचन / मनन व आचरण केल्यास आपल्या प्रकृतीला याचा फायदा अवश्य
Courtesy :
Dr Aniket Gangurde
Consultant chest physician
Nashik
Excellent information ,thank you for providing
ReplyDeletetop ent specialist in hyderabad