मधुमेही व्यक्तींसाठी सुचना:
मधुमेहातील आहार
:
हा आहार शक्य तितका नेहमीच्या आहारासारखाच असतो. जेणेकरुन पोषण नीट होयील. मधुमेही रुग्णाने एकावेळी जास्त खाऊ नये. हे सर्वात महत्वाचे पथ्य आहे. दिवसातुन तीन ते चार वेळा विभागुन थोडे थोडे खावे. महाराष्ट्रीय पद्धतीचे साधे जेवण सगळ्यात चांगले. तसेच उपास करु नयेत. उपासामुळे रक्तातील साखर कमी होणे, त्यामुळे अंधारी येणे, घाम फुटणे, छातीत धडधडणे, गुंगी येणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मधुमेही रुग्णाने उपास करु नयेत. जर वरिलपैकी त्रास झाला तर थोडी साखर , दुध,मध किंवा बिस्कीट किंवा गोड पदार्थ खावे आणि ताबडतोब दवाखान्यात यावे. साखर किंवा ग्लुकोज पावडर फिरायला जाताना नेहमी जवळ ठेवावी.
मधुमेही रुग्णाने
खालील पदार्थ टाळायला हवेत.
1) बटाटा, रताळे, साबुदाणा, फळांचा रस
2) गोड पदार्थ,
मिठाई, चाकलेट, वेफर्स
3) तळलेले पदार्थ
4) साखर व साखर
घालुन केलेले पदार्थ, गुळ, मध,
5) केळी, आंबे, द्राक्षे, सीताफळे, अशी फार गोड फळे खाऊ नयेत. चिकु किंवा छोट्या
पेरुच्या आकाराची दोन फळे
रोज चालतील.
6) तेल, तूप, लोणी, साय, चीज असे पदार्थ टाळावेत. करडई व सुर्यफुलाचे
तेल जास्त चांगले. पाम तेल वापरु नये. शेगदाणा तेल कमी वापरावे.
7) बोकड किंवा
बकरीचे मटण खाऊ नये. पंधरा दिवसांतुन चिकन किंवा माश्याचे दोन-तीन तुकडे खाण्यास
हरकत नाही. तळलेले मासे खाऊ नयेत.
8) बेकरीचे पदार्थ
टाळावेत.
9) दूध उकळुन व साय
काढुन घ्यावे. दिवसातुन एक कप दूध किंवा एखाद दोन कप चहा घेण्यास हरकत नाही.
चहामधे साखर घेऊ नये किंवा कमी घ्यावी.
व्यायामाबद्दल:
रोज नियमीत व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. भराभर अर्धा ते पाऊण तास चालण्याचा व्यायाम सगळ्यात चांगला. व्यायाम सुरु करण्याआधी रक्तदाब योग्य असावा. त्यामुळे व्यायाम सुरु करण्याआधी वैद्यकिय तपासणी करणे आवश्यक आहे.
औषधांबद्दल:
औषधे नियमीतपणे
घ्यावी. जेवणाच्या आधीची व नंतरची औषधे सांगितल्याप्रमाणे घ्यावी. जुन्या
औषधांच्या चिठ्या दाखवुन औषधे आणु नयेत.
औषधे, व्यायाम आणि
पथ्ये तिन्ही गोड्ढी सारख्याच महत्वाच्या आहेत.
पायांची काळजी:
मधुमेहामधे जखमा
लवकर ठीक होत नाहीत. त्यामुळे पायांची जास्त काळजी घ्यावी. रोज झोपण्याआधी पायांची
तपासणी स्वतः करावी. तळपायांची तपासणी आरश्याच्या मदतीने करावी.चपला किंवा बुट मऊ
व योग्य मापाचे असावे. घट्ट किंवा सैल नकोत.
दवाखान्यात येताना:
1) सांगितलेल्या तारखेस तपासणीस यावे.
2) उपाशीपोटी रक्त तपासण्यासाठी पूर्ण उपाशी
यावे.चहा/दुध/नाश्ता वगैरे घेऊ नये. पाणी घेतले तर चालेल.
3) सर्व जुने रिपोर्ट आणी औषधांच्या चिठ्या घेवुन
यावे.
4) उपाशी पोटी रक्त दिल्यानंतर नेहमी प्रमाणे
गोळ्या/इंजेक्शन घेवुनच नाश्ता करावा.
5) गोळ्या संपल्या असतील तर दुकानातुन एक
वेळापुरत्या गोळ्या घेणे.
6) नाश्ता झाल्यावर दोन तासांनी पुन्हा रक्त
तपासणी साठी द्यावे.
नियमितपणे करण्याच्या तपासण्या :
नियमितपणे करण्याच्या तपासण्या :
१) रक्तातील साखरेची तपासणी
२) HbA1c ची तपासणी
३) रक्तदाबाची तपासणी
४) डोळ्यांच्या पडद्यांची तपासणी
५) पायांची तपासणी
६) रक्तातील कोलेस्टेरोल इ . तपासणी
७) वजनाची तपासणी
८) लघवीची तपासणी ( for protein and micro albumin)
९) E.C.G.
२) HbA1c ची तपासणी
३) रक्तदाबाची तपासणी
४) डोळ्यांच्या पडद्यांची तपासणी
५) पायांची तपासणी
६) रक्तातील कोलेस्टेरोल इ . तपासणी
७) वजनाची तपासणी
८) लघवीची तपासणी ( for protein and micro albumin)
९) E.C.G.
डॉ. सिध्दार्थ
कुलकर्णी आणि डॉ. क्षितिजा कुलकर्णी
योगेश्वरी हॉस्पिटल व आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे
महाराष्ट्र ४१३८०१
फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५
योगेश्वरी हॉस्पिटल व आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे
महाराष्ट्र ४१३८०१
फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५
No comments:
Post a Comment