हाइपोथायरायडिजम आजाराबद्दल माहिती:
थायराईड ही एक लहान ग्रंथी असूुन तिचा आकार फ़ुलपाखरासारखा असतो. ती गळ्याच्या खालच्या भागात मध्यभागी असते. शरीराचा चयापचयाचा वेग ( कज्ळ्ग्घ्ब्न्त्ल्प्) नियंत्रीत ठेवणे व त्यासाठी थायराईड संप्रेरकांची निर्मीती करणे, हे या ग्रंथीचे मुख्य काम आहे. हायपोथायराईडीसम या आजारात या संप्रेरकांची निर्मीती कमी होते. येथे आपण हायपोथायराईडीसम या आजाराची माहिती घेणार आहोत.
हायपोथायराईडीजम : म्हणजे शरीरात थायराईड संप्रेरकांची निम्रिती कमी होणे. त्यामुळे चयापचयाचा वेग कमी होतो. बहुतेक वेळा रुग्णाला हा आजार आयुष्यभर रहातो व त्याकरता कायमच उपचार घ्यावे लागतात.
हायपोथायराईडीसमची लक्षणे:
थकवा व अशक्तपणा येणे
हातापायांना व चेहîयाला सुज येणे.
थायराईड ग्रंथीला सुज येणे. ( गॉयटर )
वजन वाढणे.
संधीवात होणे. हातापायांना मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे.
वंध्यत्व असणे.
विसराळूपणा वाढण, मानसिक ताणतणाव वाढणे.
केस जास्त गळणे. केस रुक्ष व रखरखीत होणे.
पाळीच्या तक्रारी ( अनियमितपणा, अधिक स्त्राव )
काही जणांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो. स्त्रियांमधे हायपोथायराईडीसम हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.
कारणे:
प्रतिकारशक्तीचा आजार : आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याच थायराईड ग्रंथीच्या विरुध्द कार्य करुन थायराईड ग्रंथीला नष्ट करते. हे या रोगाचे सर्वात जास्त आढळून येणारे कारण आहे.
थायराईडची शस्त्रक्रिया: काही आजारांमधे थायराईडची शस्त्रक्रिया करुन ती ग्रंथी पूर्णपणे काढण्यात येते.
किरणोत्साराचा उपचार, विषाणूंचा परिणाम, जन्मतःच ही ग्रंथी नसणे अशी सुद्धा काही कारणे आहेत. आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा अधिक प्रमाणामुळेसुद्धा हा आजार होतो. पण हे दुर्मिळ कारण आहे.
हायपोथायराईडीसमचे निदान: हायपोथायराईडीसमचे निदान करण्यासाठी फ4 व फदॠ या तपासण्या करणे आवश्यक आहे. केवळ बाह्यलक्षणांवरुन निदान केले जाऊ शकत नाही. कारण अनेक आजारात यासारखी लक्षणे आढळतात.
उपचार:
हा आजार पूण्र्पणे बरा होत नाही मात्र उपचारांनी थायराईड संप्रेरकांचे प्रमाण योग्य राहू शकते. आपल्या शरीरात जी थायराईड संप्रेरके तयार होतात हुबेहुब तशीच संप्रेरके गोळीच्या स्वरुपातही मिळतात. त्यामुळे योग्य प्रमाणात घेतल्यास या गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. गरोदर स्त्रियांमध्येसुद्धा गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम दिसत नाहीत.
गोळी कशी घ्यावी?
गोळी रोज सकाळी उपाशीपोटी एक पेला पाण्याबरोबर घ्यावी. गोळी घेतल्यावर अर्धा तास दुसरे कोणतेही औषध, अन्न, चहा, दूध वगैरे घेऊ नये. गोळी पाण्याशिवाय घेऊ नये. गोळी कधीही चुकवु नये. चुकून एखाद्या दिवशी गोळी घ्यायची राहीली तर दुसîया दिवशी दोन गोळ्या घ्याव्यात.पण दोनपेक्षा जास्त दिवस गोळ्या चुकल्या तरी दोनापेक्षा जास्त गोळ्या अशावेळी घेऊ नयेत.
गोळयांची कंपनी / ब्रॅण्ड बदलू डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय नये. सुट्ट्या गोळ्या घेऊ नयेत. गोळ्या नेहमी सीलबंद बाटलीत किंवा स्ट्रीपमध्ये ( पाकीटात) घ्याव्या. डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करु नयेत. हायपोथायराईडीसममधे नियमीतपणे गोळ्या घेत रहाणे आवश्यक असते.
रक्ताची पुनर्तपासणी:
फ्री T4 आणि TSH च्या पातळीसाठी रक्ताची पुनर्तपासणी दर सहा ते दहा आठवड्यांनी करणे आवश्यक आहे. गरोदरपणामधे वारंवार तपासणी करावी लागते. काही आजारांमधे, मानसिक किंवा शारीरीक ताणाच्या काळात किंवा शस्त्रक्रिया वगैरे करायचीे असल्यास रक्ताची पुनर्तपासणी अधिक वेळा करावी लागते.
डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी आणि डॉ. क्षितिजा कुलकर्णी
योगेश्वरी हॉस्पिटल व आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे
महाराष्ट्र ४१३८०१
फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५
Dr sir Is there any alternative for blood tests regarding conginantal Hypothyrodism
ReplyDeleteDr sir Is there any alternative for blood tests regarding conginantal Hypothyrodism
ReplyDelete