Tuesday, 10 March 2015

Chart for hypertension in Marathi

BP(रक्तदाबाचा) आजार असलेल्या व्यक्तींसाठी सुचना:

आहार :

खालील पदार्थ टाळायला हवेत.

1) मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत. उदा. पापड, लोणची, वेफर्स , फरसाण, शेव, खारे शेंगदाणे.
2) सोडा घातलेले व बेकरीचे पदार्थ टाळावेत. उदा. पाव, खारी, ब्रेड, बिस्कीटे.
3) साखर व साखर घालुन केलेले पदार्थ, गुळ, मध, फार खाऊ नयेत.
4)  तळलेले पदार्थ टाळावेत. तेल, तूप, लोणी, साय, चीज असे पदार्थ टाळावेत. करडई व सुर्यफुलाचे तेल जास्त चांगले. पाम तेल वापरु नये. शेंगदाणा तेल कमी वापरावे.
5) बोकड किंवा बकरीचे मटण खाऊ नये. पंधरा दिवसांतुन चिकन किंवा माश्याचे दोन-तीन तुकडे खाण्यास हरकत नाही. तळलेले मासे खाऊ नयेत.
6) दूध उकळुन व साय काढुन घ्यावे. दिवसातुन एक कप दूध किंवा एखाद दोन कप चहा घेण्यास हरकत नाही.
7) धुम्रपान, तंबाखु व दारु पुर्ण बंद करणे.
ताजी फळे , फळभाज्या आणी हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खाव्या.  जाड व्यक्तींनी वजन कमी करावे.

व्यायामाबद्दल:

रोज नियमीत व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. भराभर अर्धा ते पाऊण तास चालण्याचा व्यायाम सगळ्यात चांगला. व्यायाम सुरु करण्याआधी रक्तदाब योग्य असावा. त्यामुळे व्यायाम सुरु करण्याआधी वैद्यकिय तपासणी करणे आवश्यक आहे.

औषधांबद्दल:

औषधे नियमीतपणे घ्यावी. जुन्या औषधांच्या चिठ्ठ्या दाखवुन औषधे आणु नयेत. 
औषधे, व्यायाम आणि पथ्ये तिन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत.

डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी  आणि  डॉ.  क्षितिजा कुलकर्णी 
योगेश्वरी हॉस्पिटल व  आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे 
महाराष्ट्र ४१३८०१ 

फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५ 

  

No comments:

Post a Comment